Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंद्रपूरची सोन्याची खाण 200 किमी परिसरात....

चंद्रपूरची सोन्याची खाण 200 किमी परिसरात....


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा सोन्याचा साठा स्वतंत्र नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये तांब्याचा मोठा साठा मिसळलेला आहे. याबाबत सखोल संशोधनाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठावर असलेल्या गोंडपिपरी ते चिमूर तहसीलपर्यंत सुमारे २०० किलोमीटरच्या परिसरात हा तांब्या-सोन्याचा साठा पसरलेला आहे.

नुकत्याच सापडलेल्या सोन्याच्या साठ्याचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्याचा अहवाल केंद्रीय खाण मंत्रालयाला नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, मध्य क्षेत्र, नागपूर यांनी सादर केला होता. हा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला आहे. दोन भूवैज्ञानिकांनी हा अभ्यास केला आहे. ज्यात बल्लारपूरची बामणी आणि सिंदेवाहीची मिनझरी यांची तपासणी केली.

कसा घेतला शोध?

केलेल्या अभ्यासात, जी ४ अंतर्गत २.५ चौरस किमी व जी ३ अंतर्गत १.८५ चौरस किमी आणि १७४६.९ मीटर खोलीपर्यंतच्या खनिज स्थितीचा शोध घेतला गेला आहे.

नेमके काय आढळले?

* जी ३ अंतर्गत बामणीमधील ०.४ चौरस किमी आणि मिनझरी ब्लॉकमधील १.८५ चौरस किमी क्षेत्राचे मूल्यांकन केले.

* ज्या अंतर्गत मिनझरी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण २६ पीपीएम (पार्ट प्रतिमिलियन) ते २३०० पीपीएम आढळले आहे. सोन्याचे प्रमाण २५ पीपीबी (प्रतिअब्ज भाग) ते ११० पीपीबीपर्यंत आढळले आहे.

* तर बामणी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण ३३५ पीपीएम ते २४०० पीपीएम दाखवते. हा प्राथमिक अंदाज असल्याचे चंद्रपूरचे जिल्हा गौण खनिज अधिकारी सुरेश नैताम यांनी 'लोकमत'ला सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.