Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CNG, PNG किंमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

CNG, PNG किंमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय...


नवी दिल्ली : CNG, PNG किंमतीबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढू लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत होते. पण, केंद्र सरकारकडून सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यात आहे. मोदी सरकार लवकरच गॅसचे दर कमी विशेष योजना आखत आहे. यामुळे लवकरच घरगुती गॅस-सीएनजीचे दर स्वस्त होऊ शकते.

गॅसच्या किंमतीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून गॅस दराचे समीक्षा केली जाते. या समितीकडून प्लानिंग केली जात आहे. त्यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ओल्ड फिल्डमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ठरवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट पहायला मिळू शकते. एका अहवालानुसार, योजना आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारेख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. समितीकडून लवकरच सरकारसमोर अहवाल सादर केला जाणार आहे.

संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समिती 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्य निर्धारण व्यवस्थेला प्रोत्साहन देऊ शकते. सोबतच ओएनजीसी (Ongc) आणि ऑईल इंडिया लिमिटेडच्या फिल्डमधून येणाऱ्या गॅसची किंमती ठरवण्याबाबतही चर्चा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.