Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुकेश अंबानी आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग!

मुकेश अंबानी आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग!


नवी दिल्ली : आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. जवळपास 50 कोटी युरो (4,060 कोटी रुपये) इतका मोठा हा करार असणार आहे. या अंतर्गत रिलायन्सने जर्मनीमधील रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतात पसरलेला व्यवसाय ताब्यात घेण्याची योजना आखली आहे.

उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, करारामध्ये मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीच्या 31 घाऊक वितरण केंद्रे, भूमी बँका आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. तसेच, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेट्रो यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि गेल्या आठवड्यातच जर्मन कंपनीने रिलायन्स रिटेलच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, असाही दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, मुकेश अंबानींच्या या मोठ्या करारामुळे देशातील सर्वात मोठ्या रिटेलर रिलायन्स रिटेलला B2B सेगमेंटमध्ये आपला विस्तार वाढवण्यास मदत होईल. या कराराच्या मुद्द्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास मेट्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने स्पष्टपणे नकार दिलाआहे. रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची कंपनी विविध संधींचे मूल्यांकन करते, तर मेट्रो एजीचे प्रवक्ते म्हणाले की, आम्ही बाजारातील अफवा किंवा अनुमानांवर भाष्य करू शकत नाही.

34 देशांमध्ये मेट्रो एजीचा व्यवसाय

मेट्रो कॅश अँड कॅरीच्या ग्राहकांमध्ये किरकोळ विक्रेते आणि किराणा स्टोअर्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरर्स (होरेका), कॉर्पोरेट्स, एसएमई, कंपन्या आणि संस्था यांचा समावेश होतो. मेट्रो एजी 34 देशांमध्ये कार्यरत आहे आणि 2003 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीचे बंगळुरूमध्ये सहा, हैदराबादमध्ये चार, मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी दोन आणि कोलकाता, जयपूर, जालंधर, जिरकपूर, अमृतसर, अहमदाबाद, सुरत, इंदूर, लखनौ, मेरठ, नाशिक, गाझियाबाद, तुमाकुरू, विजयवाडा, विशाखापट्टणम, गुंटूर आणि हुबळीत प्रत्येकी एक -एक स्टोअर आहेत.

देशात रिटेल व्यवसाय वाढवतायेत मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजची सहायक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ग्रुपच्या अंतर्गत सर्व रिटेल कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात कंपनीने जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय नोंदवला होता. दरम्यान, रिटेल व्यवसाय वाढवण्यासाठी मुकेश अंबानी एकापाठोपाठ एक मोठे करार करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.