Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; इन्शुरन्स, जीएसटीचे नियम बदलतायत....

एक नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; इन्शुरन्स, जीएसटीचे नियम बदलतायत....


ऑक्टोबर महिना आज संपणार आहे. उद्यापासून नवा महिना नोव्हेंबर सुरु होणार आहे, याचबरोबर तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे काही नियम देखील उद्यापासून बदलणार आहेत. हे नियम केवळ तुमच्या खिशावरच परिणाम करणारे नाहीत तर आरोग्याच्या आपत्कालीन वेळच्या इन्शुरन्स क्लेमसाठी देखील महत्वाचे आहेत. याचबरोबर भारतीय रेल्वे हिवाळी टाईमटेबलमध्ये देखील बदल करू शकते. 

दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल केला जातो. यावेळी देखील गॅस सिलिंडरच्या किंमती बदलल्या जाणार आहेत. १४ आणि १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत हे बदल केले जातात. १ ऑक्टोबरला कंपन्यांनी कमर्शिअल वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत 25.5 रुपयांची घट केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती चढ्या आहेत, यामुळे उद्या च्या दरात वाढ केली जाऊ शकते. 

गॅस सिलिंडरबाबत आणखी एक नियम बदलला जाणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपासून डिलिव्हरी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे. उद्यापासून गॅस सिलिंडर ओटीपी दिल्यानंतरच डिलिव्हर केला जाणार आहे. ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाणार आहे. तो डिलिव्हरी एजंटला द्यायचा आहे. त्यानंतरच सिलिंडर मिळणार आहे. 

नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपासून विमा नियामक  कडून एक मोठा बदल केला जाऊ शकतो. विमाधारकांना  तपशील प्रदान करणे अनिवार्य केले जाऊ शकते. सध्या, नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसी तपशील देणे ऐच्छिक आहे, परंतु उद्यापासून ते अनिवार्य केले जाऊ शकते. विमा दाव्याच्या वेळी  कागदपत्रे सादर केली नाहीत तर दावा रद्द केला जाऊ शकतो. यामुळे हे खुप महत्वाचे आहे. 

जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. आता 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना  रिटर्नमध्ये चार अंकी  कोड लिहिणे बंधनकारक असेल. यापूर्वी दोन अंकी  कोड टाकावा लागत होता. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.