Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टाटा मोटर्स, महिंद्रा पेक्षा अधिक आहे तिरुपतीची संपत्ती..

टाटा मोटर्स, महिंद्रा पेक्षा अधिक आहे तिरुपतीची संपत्ती..


तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिराची संपत्ती २.५ लाख कोटी असून ही संपत्ती विप्रो, नेस्ले, ओएनजीसी, इंडियन ऑईल यांच्या बाजारमुल्यापेक्षा अधिक आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टची १९३३ मध्ये स्थापना झाल्यापासून प्रथमच देवस्थानाची संपत्ती घोषित केली गेली आहे. या देवस्थानाचे मूल्य ५३०० कोटीचे असून १०.३ टन सोने आणि राष्ट्रीयीकृत बँकेत १५९३८ कोटींच्या ठेवी त्यात सामील आहेत. जून २०१९ मध्ये देवस्थानाकडे ७.३ टन सोने होते ते २०२२ मध्ये १०.२५ टनांवर गेले आहे तर ठेवी १३०२५ कोटींवरून १५९३८ कोटींवर गेल्या आहेत.

महिंद्रा, टाटा मोटर्स, जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी कोल इंडिया, खाण कंपनी वेदान्ता, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ व अन्य काही कंपन्याची संपत्ती तिरुपती देवस्थान पेक्षा कमी आहे तर दोन डझन कंपन्यांची संपत्ती जास्त आहे. त्यात रिलायंस इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी, इन्फोसिस या कंपन्यांचा समावेश आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारी नुसार अनेक ब्ल्यू चिप कंपन्यांपेक्षा तिरुपती देवस्थानची संपत्ती जास्त आहे. नेस्लेची संपत्ती १.९६ लाख कोटी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.