सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात तत्कालीन नगरपालिका ने तयार केलेल्या भाजी मंडई
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात तत्कालीन नगरपालिका ने तयार केलेल्या भाजी मंडई सोडल्या तर मनपा स्थापन होऊन २४ वर्ष झाली एकही भाजी मंडई विकसित होऊ शकली नाही. मग महानगरपालिका स्थापन होऊन कोणाचा विकास झाला तर फक्त आणि फक्त कारभारी आणि अधिकारी,कर्मचारी यांचाच..... भाजी मंडई,पार्किंग,बाबत काहीही टोस पावले उचलली नाहीत ह्याची कोणालाही फिकीर नाही मग ते कोणतेही नेतृत्व असो सगळ्यांनी फक्त पोकळ घोषणा करायच्या आणि आम्ही त्या फक्त ऐकून आपल्या नेत्यांची आणि पक्षाची धूनी धुवायची.
मी ह्या बाबत मा जिल्हाधिकारी, मा जिल्हा पोलिस अधीक्षक, मा आयुक्त यांना वारंवार पत्र लिहून पाठपुरावा करत आहे त्यात थोडे फार यश आले आहे मात्र धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. आता पालकमंत्री यांचा घरा समोर चा प्रश्न आहे म्हणून हा वाद निर्माण झाला आहे तर एक व्यापक मीटिंग घेऊन पालकमंत्री महोदय यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी विनंती आहे. अन्यथा आपल्या दारातील प्रश्न सोडवून फक्त आपल्या पुरते पालकमंत्री होऊ नये अशी अपेक्षा आहे तर अखंड जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावावेत
सतीश साखळकर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.