Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन..

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन..


मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर  यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्ंय ते 64 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

टोयोटा इंडियाची ट्वीट करून माहिती

टोयोटा इंडियानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली. कंपनीनं म्हटलं की, "टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी अकाली निधन झालं. या वृत्तानं आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विक्रम किर्लोस्कर यांचा जीवनपरिचय

विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर होते आणि त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्षही होते. 25 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य

एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर यांना किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की, कार्बन उत्सर्जन कमी करणं हे देशाचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला वैज्ञानिक आधारासह या प्रकरणाकडे सर्वांगीणपणे पहावं लागेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना, हायब्रीड वाहनांवर किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दलही त्यांनी सांगितलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.