Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा - तहसिलदार प्रदीप उबाळे

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करा - तहसिलदार प्रदीप उबाळे


सांगली,  : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर अधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तक पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दं होणार असून दि. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकाला 18 वर्ष पुर्ण असणाऱ्या सर्व पात्र मतदारांनी विशेष संक्षिप्तस पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये् आपले नाव मतदार यादीत नोंद करण्यासाठी नमुना नं. 6 चा अर्ज आवश्यदक कागदपत्रासह मतदार नोंदणी अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय अथवा नजीकच्या मतदान केंद्रावर सादर करावा, असे आवाहन 283-इस्लाअमपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार वाळवा-इस्लाथमपूर प्रदीप उबाळे यांनी केले आहे.

दिनांक 19 व 20 नोव्हेंबर तसेच 3 व 4 डिसेंबर 2022 या  सुट्टीच्या दिवशीही विशेष मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या मतदार यादीमध्येप नाव नोंद असणाऱ्या सर्व मतदारांनी दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द  होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्येा आपल्या नावाची खात्री करावी व मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी नमुना नं. 6 चा अर्ज आवश्यीक कागदपत्रासह नजीकच्या मतदान केंद्रावर सादर करावा. तसेच मतदारांना www.ceo.maharashtra.gov.in व www.nvsp.in  या संकेतस्थाळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.  283 इस्लाrमपूर (वाळवा तालुका) व 284 शिराळा (वाळवा तालुका) विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी दिनांक 9  नोव्हेंबर 2022 रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाळवा इस्लादमपूर तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार वाळवा इस्लािमपूर यांचे कार्यालय, सर्व मतदान केंद्रावर तसेच www.ceo.maharashtra.gov.in व www.nvsp.in  या संकेतस्थपळावर प्रसिध्द होणार आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.