सिव्हील हॉस्पीटल इमारत परिसरात मावा, गुटखा खावून थुंकणाऱ्यावर होणार कारवाई
सांगली, : सिव्हील हॉस्पीटल सांगली इमारत व परिसरात मावा, गुटखा खावून थुंकणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना आदेशीत केले आहे. अशी माहिती पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.
सांगली सिव्हील प्रशासनामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे स्वच्छतेचा ठेका देण्यात आला असून ठेकेदारव्दारे वेळोवेळी साफसफाई केली जाते. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण संख्या असल्यामुळे नातेवाईकांची गर्दी सुध्दा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे कचरा जास्त होतो. परंतु याचे वेळोवेळी पर्यवेक्षण करण्यात येते. रूग्णांच्या नातेवाईकांना रात्रीच्या वेळी निवाऱ्याची सोय करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून सदर कामाचे अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. हे काम लवकरच सुरू होईल.
100 बेडेड इमारत स्टक्चरल ऑडीट मध्ये धोकादायक ठरविण्यात आल्याने सदर इमारतीमधील कक्ष उपलब्ध जागेमध्ये स्थलांतरीत केल्यामुळे बेड संख्या कमी झाली आहे. परंतु रूग्णाची संख्या वाढत असल्यामुळे ते अडचणीचे ठरत आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामकाज सुरू होईल असे अपेक्षीत आहे. तसेच नवीन शवविच्छेदन कक्ष बांधण्याच्या कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून याचे कामकाजही लवकरच सुरू करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.