Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हरभरा व गहू पीक प्रमाणित अनुदानित बियाणांचे अधिकृत विक्रेत्यांकडून वितरण

हरभरा व गहू पीक प्रमाणित अनुदानित बियाणांचे अधिकृत विक्रेत्यांकडून वितरण


सांगली, दि. 02,  : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व बियाणे व लागवड साहित्य (एम.पी.एम.) सन २०२२-२३ योजनेंतर्गत अनुदानावर रब्बी हंगाममध्ये हरभरा व गहू या पिकांचे १० वर्षे आतील व वरील प्रमाणित बियाणे वितरण महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व राष्ट्रीय बीज निगम यांचे अधिकृत विक्रेत्यांमार्फत करण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली यांनी केले आहे.

जिल्ह्यास असलेल्या लक्षांकानुसार प्रथम येणाऱ्या लाभार्थीना प्रथम बियाणे वाटप करण्यात येईल,  अनुदानित बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाव, प्रवर्ग, गाव, सर्वे/गट क्र., क्षेत्र, आधारकार्ड, इत्यादी कागदपत्रांची झेरोक्स प्रती व मोबाईल क्रमांक बियाणे विक्रेते यांचेकडे द्यावे. शेतकऱ्यांनी अनुदान रक्कम वगळता उर्वरित बियाण्याची रक्कम भरून महाबीज व राष्ट्रीय बीज निगमच्या अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे उचल करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यकाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.