Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंधेरी पूर्वसह सहा राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांचा आज निकाल

अंधेरी पूर्वसह सहा राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांचा आज निकाल


अवघ्या राज्यच लक्ष लागू राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालसह आज सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे.

या पोटनिवडणुकीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. भजनलाल यांची नात भव्या बिश्नोई (आदमपूर विधानसभा मतदारसंघ, हरियाणा) आणि अनंत सिंग यांची पत्नी नीलम देवी (मोकामा विधानसभा मतदारसंघ, बिहार) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांचे भवितव्य ठरणार आहे. बिश्नोई भाजप, तर नीलम राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अनंत सिंह यांना अपात्र ठरवल्यानंतर बिहारमधील मोकामा जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली.

याशिवाय बिहारमधील गोपालगंज, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. ज्या सात जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षात लढत आहेत. त्यापैकी तीन जागा भाजपकडे, तर दोन काँग्रेसकडे होत्या. तसेच शिवसेना आणि आरजेडी प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

बिहार पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आरजेडीमध्ये आहे. तर हरियाणात भाजप, काँग्रेस, आयएनएलडी आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि ओडिशात बीजू जनता दल (बीजेडी) यांच्या विरोधात भाजप आहे. 

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा धाकटा मुलगा कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आदमपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. आदमपूरची जागा 1968 पासून भजनलाल कुटुंबाच्या ताब्यात आहे. आदमपूर मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल हे नऊ वेळा आमदार होते. त्यांची पत्नी जसमा देवी एकदा आणि मुलगा कुलदीप चार वेळा आमदार होते. बिहारच्या गोपालगंज मतदारसंघातून भाजपने दिवंगत आमदार सुभाष सिंह यांच्या पत्नी कुसुम देवी यांना उमेदवारी दिली आहे. आरजेडीने येथून मोहन गुप्ता यांना उमेदवारी दिली असून बसपाने इंदिरा यादव यांना येथून उमेदवारी दिली आहे. इंदिरा या माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे मेहुणे साधू यादव यांच्या पत्नी आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.