Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री.अमोल आनंदराव शिंदे यांच्या वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना चांगलाच लाभ होत आहे.

श्री.अमोल आनंदराव शिंदे यांच्या वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना चांगलाच लाभ होत आहे.



श्री.अमोल आनंदराव शिंदे यांच्या वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना चांगलाच लाभ होत आहे. डोळ्यांची शास्त्रकिया मोफत होत आहेत, तज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या सल्याने गोळ्या व  औषधे मोफत दिली जात आहेत, आरोग्य संदर्भात सर्व नागरिकांना श्री. अमोल शिंदे यांच्याकडून मोठा हातभार लावला जात आहे. भाळवणी पंचक्रोशी व आळसंद पंचक्रोशी मधील गावामध्ये महाआरोग्य शिबीरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आहे . 

काल रविवारी १३ नोव्हेंबर ला तडसर या गावामध्ये तडसर पंचक्रोशी मधील महाआरोग्य शिबिराचा उपक्रम संपन्न झाला.  माजी सैनिक मा. श्री संभाजी गिड्डे यांच्या हस्ते नारळ फोडून या शिबिराची सुरवात करण्यात आली.  यावेळी तडसर गावातील संस्थेचे सर्व स्वयंसेवक तसेच भाळवणी गावातील स्वयंसेवक, गावातील सामाजिक व राजकीय मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.  मा.डॉ. अमित पवार व डॉ. किल्लेदार यांची अनुराधा सुपरस्पेसिलीस्ट आय हॉस्पिटल यांची डॉ. टीम यांनी मोफत तपासणी केली. 

उपस्थितांचे समाजसेवक श्री. दत्ता सूर्यवंशी यांनी आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.