Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!

सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!


नवी दिल्ली : जर तुमच्याकडेही घरगुती गॅस सिलिंडर  कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही आनंद होईल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  द्वारे क्यूआर कोड  आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करू शकाल.

पुढील तीन महिन्यांत सर्व घरगुती गॅस सिलिंडरमध्ये क्यूआर कोड असेल, असे इंडियन ऑइलचे  अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य  यांनी सांगितले. तर जागतिक एलपीजी सप्ताह 2022 च्या  निमित्ताने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी  म्हणाले की, हा एक क्रांतिकारी बदल आहे, कारण ग्राहकांना एलपीजी सिलिंडरला ट्रॅक करता येईल. क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

उदाहरणार्थ, सिलिंडर कोठे रिफिल करण्यात आला आहे. सिलिंडरशी संबंधित कोणत्या सुरक्षा चाचण्या केल्या आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती समजू शकेल. दरम्यान, क्यूआर कोड सध्याच्या सिलिंडरवर लेबलद्वारे पेस्ट केला जाईल, तर तो नवीन सिलेंडरवर वेल्डेड केला जाईल. पहिल्या टप्प्यात युनिट कोड-आधारित ट्रॅक अंतर्गत क्यूआर कोड एम्बेड केलेले 20 हजार एलपीजी सिलिंडर जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, क्यूआर कोडा हा एक प्रकारचा बारकोड आहे, जो डिजिटल डिव्हाइसद्वारे वाचता येतो.

हरदीप सिंग पुरी म्हणाले की, पुढील तीन महिन्यांत सर्व 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड बसवला जाईल. याचबरोबर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) लाँच करण्यापूर्वी देशातील ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता हे मोठे आव्हान होते. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजना सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असेही हरदीप सिंग पुरी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.