Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारने आधारच्या नियमात केला बदल..

केंद्र सरकारने आधारच्या नियमात केला बदल..


आधार कार्डबाबत केंद्र सरकारने नियम बदलला आहे. हा नियम जर तुम्ही समजून घेतला नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. आधार कार्ड सगळीकडे आपल्याला आवश्यक असतं. अगदी बँकेपासून ते ओळखपत्र म्हणून वापरण्यासाठी. त्यामुळे हा केंद्र सरकारचा नियम काय बदलला ते समजून घेऊया.  आधार कार्ड आता दर १० वर्षांनी अपडेट करावं लागणार आहे, अशी माहिती UIDAI ने दिली आहे. दर 10 वर्षांनी ते करणं बंधनकारक असले. याबाबत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

या अपडेटसाठी आधार कार्ड धारकांना ओळखपुरावा आणि अॅड्रेस प्रूफ देणं बंधनकारक आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही प्रक्रिया करू शकता. ऑफलाइन केल्यास तुम्हाला 50 रुपये द्यावे लागू शकतात. ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आधार कार्डच्या ऑनलाइन uidai.gov.in पोर्टलवर भेट द्या. तिथे प्रोसेस टू अपडेट अॅड्रेस हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला नंबर अपलोड करा. तुम्हाला एक OTP येईल. तुमचा नंबर वैध असल्याचं त्यावरून समजेल. त्यानंतर Proceed to Update Address वर क्लीक करा. तुमचा 12 अंकांचा आधार कार्ड नंबर अपडेट करा. सेंड OTP म्हणा आणि आलेला OTP तिथे पोस्ट करा. त्यानंतर update address via address proof पर्याय निवडा. तुम्ही याला पर्याय म्हणून Update Address via Secret Code हा देखील पर्याय निवडू शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.