अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. रस्ता सुरक्षा विषयक कायद्याच्या जनजागृतीसाठी शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदि उपस्थित होते.
अपघातातील सर्व समावेशक माहिती संकलीत करण्यासाठी IRAD ॲप केंद्र शासनाने विकसीत केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या ॲपचा वापर सांगली जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात यावा. Save Life Foundation मार्फत अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांच्या कामकाजाबाबत तसेच सांगली जिल्ह्यातील अपघाताच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या ठिकाणांच्या (ब्लॅक स्पॉट) संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. ब्लॅक स्पॉट वरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनाने सर्व विभागांनी केलेल्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाय योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.