Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा  - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पवार


सांगली, दि. 02, :  महिला व बाल विकास विभागामार्फत शेतकऱ्यांच्या/ शेतमजुराच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभ मंगल सामुहिक विवाह योजना राबविणेत येत असून या योजनेचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.जी. पवार यांनी केले आहे.

या योजने अंतर्गत मंगळसूत्र व इतर वस्तूची खरेदी करणेसाठी प्रती जोडपी रूपये 10 हजार एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते व सामुहीक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रती विवाह रूपये दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते.  

योजनेचा लाभ शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी राहील.  वधू ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्हयाची स्थानिक अधिवासी असावी.  विवाह सोहळ्याचे दिनांकास वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्ष यापेक्षा कमी असू नये. तलाठी / तहसिलदार यांनी दिलेला १ लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला असावा. या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जावून विवाह करतील त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल,  वधू विधवा किंवा घटस्फोटात असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील,  वधू व वर यांनी विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सांगली यांचे कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये यांच्यासाठी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविणेत येत असल्याने या घटकातील दांपत्ये या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र राहणार नाहीत.

तरी जिल्ह्यातील गरीब शेतकरी/शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरीता या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महिन्याच्या आत इच्छुक संस्थानी त्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय अभय केंद्र ( संरक्षण अधिकारी) कार्यालय पंचायत समिती येथे सादर करावेत, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी कले आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.