Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'सॅलरी' त विमान येणारच महाडिक, काळे, मुलाणी..

'सॅलरी' त विमान येणारच महाडिक, काळे, मुलाणी..



सांगली, ता. ४ : सॅलरी सोसायटीमधील विरोधी गटाचे नेते कधीही सभासद नव्हते. त्यामुळे त्यांना संस्थेबद्दल किती आस्था असेल, हा प्रश्न आहे. संस्थेच्या स्थापनेपासून तीन वेळचा अपवाद सोडला तर आम्ही सातत्याने सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलोय. यंदाही सभासदांच्या विश्वासामुळे सत्तेची परंपरा कायम राहील, असा विश्वास अध्यक्ष पी. एन. काळे, ज्येष्ठ नेते डी. जी. मुलाणी यांनी व्यक्त केला. विरोधकांची आत्मघातकी आश्वासने संस्थेला रसातळाला नेतील, असेही ते म्हणले. सॅलरी सोसायटीच्या निवडणूक प्रचाराची सांगता रॅलीने झाली. त्यानंतर अध्यक्ष काळे, मुलाणी बोलत होते. पॅनेलचे जे. के. महाडिक, पी. वाय. जाधव, सुरेंद्र पेंडुरकर, एस. एस. पाटील, दिलीप पाटील, एस. एच. सूर्यवंशी, सी. एच. पाटील, प्रदीप कदम, संजय व्हनमाने यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

अध्यक्ष काळे म्हणाले, सत्तारूढ पॅनेलने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली आहे. विद्यमान संचालकांनी सभासदांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबविल्यामुळे सत्तारूढ पॅनेलवरच सभासदांचा विश्वास आहे. संस्था, सभासदांच्या हिताचा कारभार करून विद्यमान संचालकांनी ठेवींमध्ये वाढ केली आहे. संस्थेचे भागभांडवल वाढलेले आहे. कर्जवाटप मोठ्या प्रमाणात केले. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यात विद्यमान संचालकांना यश आले आहे. सॅलरी सुरक्षा निधी योजनेमुळे मृत सभासदाचे कर्ज माफ केले जाते.


ज्येष्ठ नेते मुलाणी म्हणाले, "सॅलरीची चौफेर प्रगती झाल्यामुळे संस्थेला दरवर्षी बँक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे सभासद विद्यमान कारभारावर समाधानी आहेत." प्रचाराच्या सांगतेवेळी सत्तारूढ पॅनेलने प्रचार फेरीचे आयोजन केले होते. सांगली, मिरज, कुपवाड शहरांतील सर्व शासकीय कार्यालयांतील सभासदांच्या भेटी घेतल्या. सभासदांचा विश्वास, पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सत्तारूढ पॅनेल बहुमताने निवडून येईल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला. भरत माने, आर. ए. पाटील, एम. व्ही. भोई, विजय तोडकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.