निवडणूक तोंडावर विरोधकांचे आरोप..
'सॅलरी' निवडणूक पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूर येथील सभासदाच्या बैठकांतून ते बोलत होते. विद्यमान अध्यक्ष पी. एन. काळे, ज्येष्ठ नेते डी.जी. मुलाणी, पी. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुरेंद्र पेंडूरकर, एस. एच. सूर्यवंशी, एस. एस. पाटील, सी. एच. पाटील, दिलीप पाटील, प्रदीप कदम उपस्थित होते
महाडिक म्हणाले, विद्यमान संचालकांनी सभासदांना विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याने सभासद समाधानी आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, जागा, घर खरेदी, प्लॉट खरेदी, वाहन खरेदीसाठी तात्काळ आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळेच सत्ताधारी मोठ्या मताधिक्याने जिंकणारच आहेत. संचालकांवरील विश्वासामुळेच दोनशे कोटीवर ठेवी वाढल्या. संस्थेत गैरव्यवहार असता तर ठेवी घटल्या असत्या. केवळ निवडणूक तोंडावर आरोप सुरु आहेत. त्यांना सभासद थारा देणार नाहीत. सत्ताधारी मताधिक्यांने जिंकतील.
नोकरभरती, इमारती व बांधकामे सभासदांच्या गरजेसाठी विस्तारल्या आहेत. त्यातून सर्वांची सोय हे हित आहे. संस्थेच्या हिताला गालबोट लागेल, असे काम आमच्या संचालकांकडून यापुर्वी झाले नसून भविष्यातही होणार नाही, याची मी सर्वांना खात्री देतो.
अध्यक्ष काळे म्हणाले, गेल्या सात वर्षात संस्थेची चौफेर प्रगती साधली आहे. संस्थेला राज्यस्तरीय बँको पुरस्कार, सहकार पुरस्काराने नावलौकिकात भर पडली आहे. नेते मुलाणी म्हणाले, “विरोधकांकडे नेता नाही. जे नेते आहेत ते सभासद नाहीत. असे संस्थेचे हित कसे जोपासणार, असा प्रश्न उपस्थित केला. पी. वाय. जाधव म्हणाले, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी मातृसंस्था आहे. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपाने संस्थेची प्रतिमा मलिन होतेय. त्यांना निवडणूकीत सडेतोड उत्तर मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.