Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील तर व्हा. चेअरमन पदी डॉ. अशोक आण्णा सकळे यांची एकमताने निवड

कर्मवीर पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील तर व्हा. चेअरमन पदी डॉ. अशोक आण्णा सकळे यांची एकमताने निवड


सांगली येथील प्रतिथयश कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सांगलीची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या सालाकरिताची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची संस्थेच्या चेअरमनपदी फेरनिवड व व्हा. चेअरमनपदी डॉ. अशोक आण्णा सकळे यांची एकमताने निवड करणेत आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय अधिकारी श्री. बी. एस. पवार होते.

कर्मवीर पतसंस्थेचा सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये अग्रनामांकीत आधुनिक व विश्वसनीय पतसंस्था असा नावलौकीक आहे. संस्थेच्या ५३ शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या ठेवी ७७५ कोटी कर्जे ५५४ कोटी गुंतवणुक २८३ कोटी व स्वनिधी ७२ कोटी ६२ लाख आहे. संस्थेची सभासद संख्या ४९६९४ आहे. संस्थेस सतरा वेळा आदर्श पतसंस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेचे कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग आहे. तसेच SMS / NEFT / RTGS QR Code या बँकींग सुविधा व लॉकर सेवा संस्थेतून दिल्या जातात. नुकतेच सांगली येथे संस्थेच्या आधुनिक मुख्य कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. नुतन चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील हे संस्थेचे जेष्ठ संचालक आहेत. ते सामाजिक आर्थिक, धार्मीक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात सक्रिय असून अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणुन काम करीत आहेत.


व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी पुर्वी संस्थेचे संचालक म्हणुन काम केले आहे. त्यांना सहकार क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. हे दोघेही कर्मवीर पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले.


 

नुतन चेअरमन यांनी आपल्या मनोगतात आधुनिक सेवेच्या माध्यमातून ग्राहक सेवेला सर्वोच्य प्राधान्य देवू. संस्थेचा नावलौकीक संपुर्ण महाराष्ट्रभर पोहचवू व सर्व घटकांना सोबत घेऊन संस्थेची इच्छित प्रगती साध्य करु अशी ग्वाही दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वानी योगदान देणेचे आवाहन त्यांनी केले. व्हा. चेअरमन यांनी देखील संस्थेला सहकारातील आदर्श संस्था बनविण्यासाठी सर्वाना सोबत घेऊन काम करु त्यासाठी सेवकांचे सहकार्य महत्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सभासदांचे आभार मानले.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील, अॅड. श्रीमंधर पारिसा मगदुम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. आण्णासो कल्लाप्पा चौगुले (नाना). डॉ. अशोक आण्णा सकळे. डॉ. श्रीकांत बाळगोंडा पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, श्री. बजरंग भाऊसो माळी, श्री. आप्पासो दादू गवळी श्री. अमोल विनायक रोकडे संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व सौ. चंदन नरेंद्र केटकाळे उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे यांच्यासह मोठया संख्येने सभासद, सेवक व मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.