Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सरकार वाचवण्यासाठीचं ढोंग आहे. मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत"

"सरकार वाचवण्यासाठीचं ढोंग आहे. मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत"


शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतापगडावर उपस्थित राहणार आहेत. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. शिवप्रताप दिनानिमत्ताने प्रतापगडावर सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपथित राहणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, सरकार वाचवण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना त्यांची सरकार विरुद्धची आक्रमकता दिसत होती. ते म्हणाले, शिवप्रताप गडावरील जल्लोष जो आहे तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. महाराजांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी हा जल्लोष होतो. शिवप्रताप दिनाचे महत्त्व समजून घ्या. महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यापालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्त्व अधिक वाढले असते, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. राज्यपालांच्या विधानानंतरही शिंदे चुप्पी साधून आहेत. ही त्यांची हतबलता आहे. विफलता आहे. सरकार वाचवण्यासाठीचे ढोंग आहे. महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत आणि मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.