घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली ४ : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील विजाभज प्रवर्गातील लाभार्थीसाठी व भटक्या जमाती-क धनगर समाजातील लाभार्थीसाठी वैयक्तिक घरकुल योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेंचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी संबित ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
योजनेच्या अटी, शर्ती व अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.