Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सतरा पोेलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या

सतरा पोेलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या 



सांगली ः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक पदावरील १७ जणांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी दिले. बदली झालेल्यांपैकी बहुतांशी त्या त्या पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. सतत चर्चेत नावे असलेल्या संबधित कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्याने इतर अंमलदारांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेली यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगताना अवैध धंद्यांच्याबाबतीतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. याचा प्रत्यय निवडक अंमलदारांच्या बदल्यांच्या आदेशावरुन आला आहे. बहुतेक कर्मचार्‍यांच्या बदल्या जत आणि उमदी पोलिस ठाण्यांकडे करण्यात आल्या आहेत. जत आणि उमदी परिसरात तब्बल ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, पोलीस बल कमी पडू नये, म्हणून संबधित अंमलदारांच्या नेमणुका जत आणि उमदी येथे करण्यात येत असल्याचे डॉ. तेली यांनी आदेशात नमुद केले आहे. बदली झालेल्या अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्याबरोबरच संबधित प्रभारी अधिकार्‍यांनी त्याबाबतच अहवाल त्वरीत द्यावा, असेही डॉ. तेली यांनी स्पष्ट केले आहे.

बदली झालेल्यांमध्ये हवालदार सिकंदर तांबोळी ( पोलीस उपाधीक्षक, कार्यालय, सांगली), गुंडोपंत दोरकर ( सांगली शहर), सागर देशिंगकर ( विश्रामबाग), स्वप्नील कोळी ( विश्रामबाग), कपील साळुंखे (सांगली ग्रामीण), दिनेश माने ( संजयनगर), अमोल नायर ( संजयनगर), सचिन ओंबासे ( उपाधीक्षक कार्यालय, मिरज) , सुमित सुर्यवंशी ( वाहतुक शाखा, मिरज) , राहुल सातपुते ( वाहतुक शाखा, मिरज), सय्यदअल्ली मुल्ला ( मुख्यालय) यांची बदली जत पोलिस ठाण्याकडे करण्यात आली आहे.  प्रविण वाघमोडे ( मिरज ग्रामीण), बाळासाहेब निळे ( महात्मा गांधी चौक), दिपक कांबळे ( सांगली शहर), विजय अकुल ( पोलीस उपाधीक्षक कार्यालय, जत),रियाज मुजावर ( पोलीस उपाधीक्षक कार्यालय, विटा), सचिन पाटील ( पोलीस उपाधीक्षक कार्यालय, इस्लामपूर) यांच्या बदल्या उमदी पोलीस ठाण्याकडे करण्यात आल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.