Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यापुढे ऊस वाहतूकदारांची, ऊस तोडणी मुकदमाने फसवणूक केल्यास दरारा या संघटनेशी संपर्क साधावा - अध्यक्ष संतोष पाटील.

यापुढे ऊस वाहतूकदारांची, ऊस तोडणी मुकदमाने फसवणूक केल्यास दरारा या संघटनेशी संपर्क साधावा - अध्यक्ष संतोष पाटील.


ऊस तोडणी कामगार हा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते काबड कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतो. ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी कामगार मजूर यांच्यातील मुकदम हा दुवा असतो .ऊस तोडणी कामगारला  न जात, न धर्म, ना पंत,ना भाषा ,ना पक्ष, ना नेता, माहीत नसते .दिवसभर काबड कष्ट करणे आणि आपल्या मुला बाळांना सांभाळणे हेच त्याचे अंतिम देह असते. ऊस वाहतूक दारांचे ऊस तोडणी कामगारा बरोबर प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे याचाच गैरफायदा घेऊन ऊस तोडणे मुकदम, ऊस तोडणी कामगारांच्या कमी शिक्षणाचा, असंघटित असल्याचा फायदा घेऊन तो ऊस वाहतूक दरा कडून  पैसे घेऊन ऊस तोडणी कामगारांच्या नावावर ऊस वाहतूकदारांना फसवत असतो .असे अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहेत. हा आकडा कमीत कमी 200 ते 300 कोटी रुपये पर्यंत आहे. मागील काही वर्षांमध्ये ज्या ज्या ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मुकादमाने ,ऊस तोडणी कामगार, देतो म्हणून उचल घेतली असेल आणि त्यांनी फसवलेअसेल व अशा सर्व ऊस वाहतूकदारांना नवीन ऊस तोडणी मुकादमा बरोबर व्यवहार करायचे असेल व भविष्यातील फसवणूक टाळायची असेल तर त्यांनी आमच्या दरारा या सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा. 

यामध्ये नवीन ऊस वाहतूक दराने नवीन ऊस तोडणी पुरवणाऱ्या मुकादम बरोबर करार करताना दरारा या संघटनेने काही नियमावली केले आहे ही नियमावली कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून भविष्यात ऊस तोडणी मुकादम हा ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणार नाही याविषयी काटेकोरपणे पालन करण्यात येईल यामध्ये ऊस वाहतूक दाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड ,रहिवासी पुरावा ,चेक बुक, बँकेचे पासबुक, दोन जामीनदार, ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला, संबंधित पोलीस स्टेशनचा चारित्र्य पडताळणीचा दाखला, घराचा सातबारा उतारा, जमिनीचा उतारा, दोन जामीनदार, हे सर्व शंभर रुपये स्टॅम्पवर नोटरी अग्रीमेंट होईल व सर्वात महत्त्वाचं म्हणजे  त्याला देण्यात येणाऱ्या  पैशाचे त्याच्या बँकेकडून बँक गॅरंटी घेतली जाईल.


या सर्व कागदपत्रे घेतल्याशिवाय कोणीही ऊस वाहतूक दाराने ऊस तोडणी मुकादम बरोबर करार करू नये या सर्व नियमाची अटीचे बंधन घालूनच ऊस तोडणी मुकादम बरोबर ऊस वाहतूकदाराने करार करूनच त्याला पैसे द्यावे व मागील काही काळामध्ये ऊस तोडणी मुकादमाने ऊस वाहतूकदारांना फसवले आहे त्यांची माहिती द्या जेणेकरून आम्हाला त्याच्या गावात जाऊन त्यांनी फसवलेला चा पंचनामा करण्यात येईल यामध्ये त्या गावात जाऊन, पंच कमिटीला भेटून त्याच्या विषयी माहिती दिली जाईल, त्याचे फसवल्याचे डिजिटल बोर्ड लावले जातील,  कॉर्नर सभा घेतल्या जातील, पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तक्रार दिली जाईल, व लोकशाहीच्या मार्गाने फसवलेल्या ऊस तोडणी मुकादमाच्या  घरासमोर बेमुदत उपोषण करता येईल अशा सर्व लोकशाहीच्या चौकटीतून ज्या ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली आहे त्यांची सुटका केली जाईल. 

म्हणून सर्व ऊस वाहतूकदारांनी आमच्या दरारा या ऊस वाहतूक संघटनेशी संपर्क करावा अशी विनंती दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली. सर्व ऊस वाहतूकदारांनी सांगली येथील चव्हाण कॉम्प्लेक्स, सुभाष चौक, एसटी स्टँड जवळ, सांगली या ठिकाणी 73 85 86 54 29 या नंबरवर संपर्क साधावा. असे आव्हान राज्य प्रवक्ता व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी नम्र आवाहन केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.