गुगवाड येथे भव्य-दिव्य धम्मभूमीचे शनिवारी होणार लोकापर्ण उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांची माहिती
सांगली: जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुगवाड येथे चैत्यभूमी, दीक्षाभूमीच्या धतीर्वर जागतिक दजार्चे भव्य आणि दिव्य असे विपश्यना केंद्र तसेच बुद्ध विहार उभारण्यात आले आहे. या धम्मभूमीच्या लोकापर्ण सोहळ्यासाठी जगभरातील भन्तेजी, महाथेरोजी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी या भव्य दिव्य धम्मभूमीचे लोकापर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिथयश उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगलीकर म्हणाले, माझा मुलगा अथवर् याच्या स्मरणाथर् माझ्या जन्मभूमीत वीस एकर परिसरात ही भव्य दिव्य वास्तू उभारण्यात आली आहे. यामध्ये विपश्यना केंद्र तसेच बुद्ध विहार धम्म उपासना केंद्र असणार आहे. पंधरा हजार चौरस फूट बांधकाम यासाठी करण्यात आले आहे. एकावेळी सुमारे एक हजार लोक विपश्यना करू शकणार आहेत. या इमारतीचे शनिवारी लोकापर्ण करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही सांगलीकर यांनी यावेळी सांगितले.
या कायर्क्रमासाठी देश आणि जगभरातील ५०० भन्तेजी आणि ५० महाथेरोजी उपस्थित राहणार आहेत. राज्य तसेच देशभरातून सुमारे २५ हजार उपासकही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सांगलीकर यांनी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कायर् केले आहे. देशभरातील तसेच जगभरातील बौद्ध धम्म उपासकांसाठी हे महत्वाचे केंद्र ठरणार असल्याचे जतमधील नागरिकांचे म्हणणे आहे. गुगवाडसारख्या ग्रामीण भागात सांगलीकर यांनी भव्य आणि अतिशय सुंदर बुद्धविहार उभारले आहे. राज्यातील सवार्त मोठे तिसरे विहार म्हणून त्याची गणना होणार आहे. मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षाभूमीनंतरचे हे सवार्त मोठे बुद्ध विहार असणार आहे.
या विहारमध्ये थायलंड येथून आणलेल्या बुद्ध मुतीर्ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी धम्मभूमी परिसरात पंचशील आणि ध्वजारोहण होणार आहे. भदंत बोधीपालो महाथेरो, लोकोत्तरा महाविहारा चौका, यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर जयसिंगपूर येथील भदंत डॅ. यश काश्यपायन महाथेरो यांच्याहस्ते बोधी वृक्षवंदना होणार आहे. नांदेड येथील भदंत डॅ. उपगुप्त महाथेरो यांच्याहस्ते या धम्मभूमी विहाराचे लोकापर्ण होणार असल्याचेही यावेळी उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.