Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुंकू लाव तरच बोलेन,' महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे वादात...

कुंकू लाव तरच बोलेन,' महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे वादात...


सातत्याने वादग्रस्त विधान करत आलेले भिडे गुरूजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज काही कामानिमित्त ते मुंबईला मंत्रालयात आले होते. तेव्हा साम टीव्ही या वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उद्धटपणे बोलत महिला पत्रकाराचा अपमान केला.

संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरूजी काही कामानिमित्त आज मंत्रालयात आले होते. दरम्यान साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला. भिडे गुरूजी मंत्रालयात आले असता गुरूजी आज तुम्ही मंत्रालयात आला आहात. आज आपण कुणाची भेट घेतली, असे महिला पत्रकाराने विचारताच, ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणाले.


‘आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रूप आहे आणि भारत माता विधवा नाही आहे. त्यामुळे तू कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो.’ असे म्हटल्यानंतर महिला पत्रकाराला काय बोलावे, हे सुचले नाही. त्यानंतर हा संवाद थांबला आणि या घटनेवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुंकू लावा, असं भिडे कसं सांगू शकतात, असे प्रश्‍न समाजाच्या विविध स्तरातून विचारण्यात आले. वाट्टेल ते बोलून महिलेचा अपमान करण्याचा अधिकार भिडेंना कुणी दिला, असे प्रश्‍न समाजातून उठू लागले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.