Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गँम्बिया सरकारने घेतला यू-टर्न; भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू नाही?

गँम्बिया सरकारने घेतला यू-टर्न; भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू नाही? 


गँबियात  कफ सिरपच्या  सेवनामुळे 66 मुलांना आपला जीव गमवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याप्रकरणी भारतामधील कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीवर आरोप जाले होते. आता याप्रकरणात गँबिया सरकारनं यु टर्न घेतला आहे. भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं गँबिया सरकारनं सांगितलं आहे. गँबियातील मेडिसिन कंट्रोल एजन्सीनं रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यातील असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, गँबियाचे हेल्थ डायरेक्टर मुस्तफा बिट्टाये यांनी मुलांचा मृत्यू हा किडनीच्या आजारामुळे झाल्याचं सांगितलं होतं. सुत्रांच्या मते, भारताने या प्रकरणाच्या सिरपला मंजुरी देण्यावरुन गँबिया सरकारच्या नियमांवर बोट ठेवलं होतं. भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 66 मुलांचा मृत्यूचा उलगडा पोस्ट मार्टममध्ये झाला आहे. त्यामधून असं समोर आलेय की, 66 मुलांना ई-कोलाई आणि डायरिया झाला होता. तर त्यांना कफ सिरप का दिलं.

WHO नं काय म्हटलं होतं?

मेडेन फार्माकडून तयार करण्यात आलेल्या चार प्रकारच्या कफ सिरपमुळे गँबियातील 66 मुलांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस म्हणाले होते की, 'WHO ने गँबियामध्ये मिळालेल्या चार दुषित कफ सिरपबाबत एक मेडिकल प्रोडक्ट अलर्ट जारी करण्यात आले आहे. जो किडनीच्या गंभीर आजारांसाठी आणि 66 मुलांच्या मृत्यूशी जोडलेले आहे. ' गँबियातील मुलांच्या मृत्यूसाठी ज्या चार कफ सिरपवर जागतिक आरोग्य संघटनेनं आक्षेप घेतला. त्यामध्ये प्रोमेथोजिन ओरल सोल्यूशन, मॅग्रीप एन कोल्ड सिरप, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप आणि मकॉफ बेबी कफ सिरप यांचा समावेश आहे. या औषधांमध्ये आरोग्याला घातक असे काही घटक असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

भारत सरकारकडून चौकशीचे दिले होते आदेश

गँबियातील दुर्दैवी घटनेनंतर भारतात तयार होणाऱ्या कफ सिरप कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय औषधं नियामक मंडळाने कडक पाऊले उचलत मेडेन फार्माच्या कफ सिरपची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या संबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे. चौकशीचे रिपोर्ट येईपर्यंत कंपनीतील उत्पादन बंद करण्यात आले होते.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.