वैधमापन शात्र अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या 134 आस्थपनांवर कारवाई वैधमापन शात्र विभागाची माहिती
सांगली ४ : आवेष्टीत वस्तुंची जादा दराने विक्री करणे, माल कमी देणे, आवेष्टीत वस्तुंवर विहित उदघोषणा न छापणे, मुदतीत वजनमापांची फेर पडताळणी न करणे याबाबतची उल्लंघन केल्याने जिल्ह्यातील 134 आस्थपनांवर वैद्यमापन शास्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक द. प्र. पवार यांनी दिली.
सांगली जिल्हयात विशेष दिवाळी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये किराणा भुसार, मिठाई विक्री, ज्वेलरी शॉप व शोभेच्या वस्तू विकणारे यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आवेष्टीत वस्तू संदर्भात उल्लंघन आढळून आलेल्या २० व्यापा-यांवर व विहीत मुदतीत वजने मापे पडताळणी न करणे व त्या अनुषंगाने इतर उल्लंघनाबाबत १२ व्यापा-याविरुध्द कार्यवाही करण्यात आली. माहे ऑक्टोबर २०२२ अखेर रु. १ कोटी २० लाख ८२ हजार ३४६ रुपये पडताळणी व मुद्राकंन शुल्क वसुली झालेली आहे व रु ५ लाख ५६ हजार ५० रुपये एवढा दंड दोषी व्यापा-यांकडून वसुल करण्यात आलेला आहे. या कार्यालयाकडे माहे ऑक्टोबर २०२२ अखेर ४१ तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या व त्यापैकी ३६ तक्रारीचा अत्यंत पारपदर्शकपणे निपटारा करण्यात आलेला आहे.
त्यामुळे फसवणुक करणा-या व्यापा-याविरुध्द नागरिक लेखी किंवा ऑनलाईन राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाईन किंवा या यंत्रणेच्या ई-मेल वर तक्रारी दाखल करु शकतात. आपले तक्रारीनुसार फसवणुक करणा-या दोषी व्यापा-यांची गय न करता खटले नोंद करण्यात येतील, त्यामुळे नागरिकांनी फसवणुक असल्यास तक्रारी दाखल कराव्यात. साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात सर्व कारखान्यांची मा. जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकाद्वारे अत्यंत पारदर्शीपणे तपासणी करणेत आलेली आहे. काही संघटनाद्वारे सर्वच कारखान्यामध्ये काटामारी होत असल्याची निवेदने प्राप्त झालेली आहेत. त्या अनुषंगाने कारखानदारांनी अशा काटामारीची गैरकृत्य करु नयेत अन्यथा कोणाचीही गय न करता कायदेशीर कार्यवाही करणेत येईल. काटामारी करुन कारखान्यांद्वारे फसवणूक होत असल्यास शेतक-यांनी सुध्दा न घाबरता नेमक्या फसवणुक करणा-या कारखान्यांविरुध्द तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही वैद्यमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक द. प्र. पवार यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.