Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्ताधारी गळा घोटत आहेत चित्रपट सृष्टीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा - डॉ सुभाष देसाई

सत्ताधारी गळा घोटत आहेत चित्रपट सृष्टीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा - डॉ सुभाष देसाई 


भारताच्या कानाकोपऱ्यातून आता एकच आवाज उमटू लागला आहे की बॉयकॉट करायला हवे. कोणाविरुद्ध तर केंद्र सरकार विरुद्ध पण असे म्हणणाऱ्यांना मुळात बॉयकॉट हा शब्दप्रयोग कसा आला आणि त्याचा अर्थ काय हेच माहीत नसतं. बॉयकॉटची कल्पना ही आयर्लंडमध्ये जन्माला आली एक ब्रिटिश टॅक्स कलेक्टर 1880 मध्ये होऊन गेला त्याचं नाव होतं चार्लस कनिंगहॅम बॉयकॉट. त्यांने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना खूप छळलं कोणाला सोडल नाही कोणाचं शोषण केलं नाही असं घडलंच नाही आणि मग एक जन आक्रोश सुरू झाला त्यामध्ये साऱ्यांनी ठरवलं की  त्याच्याशी असहकार करायचा आणि सामुदायिक उठाव करून त्याची ही दादागिरी मोडायची आणि तशी ती मोडली गेली आणि त्यानंतर जगभर बॉयकॉट हा शब्द प्रयोग वापरायला सुरू झाले .

थोडक्यात अन्यायाविरुद्धचे बंड ,शोषणाविरुद्धचे बंड सर्वसामान्यांच्या मनातील ही खदखद प्रगट होणे आणि एखाद्या गोष्टीवर बहिष्कार टाकणे त्याला बॉयकॉट म्हणतात. भारत देशात स्वातंत्र्यानंतर अशी परिस्थिती सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच आली आहे जणू मोदी अमित शहा डॉक्टर मोहन भागवत या साऱ्यांची ईस्ट इंडिया कंपनीत फॉर्म झाली आहे आणि व्यापारापाठोपाठ राजकीय सत्ता हाती येते हे ब्रिटिशांनी त्यांना शिकवल्यामुळे अदानी अंबानी असे मूठभर उद्योगपती देशाच्या सार्वजनिक संपत्तीचा ताबा घेत आहेत. याचाच अर्थ भारतीय स्वातंत्र्याचा संकोच झाला असून प्रत्येक दिवस पारतंत्र्याकडे निघाला आहे तूर्क आले हून आले मोंगल आले ब्रिटिश, फ्रेंच आले पोर्तुगीज आले आणि आता राष्ट्रीय सेवक संघ सर्वेसर्वा बनू इच्छितो तो किती वर्षे राहील आणि पुन्हा भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती बलिदान करावे लागेल हे आता काळच ठरवेल पण साऱ्यांचेच संमोहिकरण ,मोहनीकरण झाल असेल तर मात्र गुलाम होण्याच्या लायकीचेच आम्ही आहोत यात शंका नाही.

आता बॉयकॉट कशाकशावर नाही ? आता सिने इंडस्ट्रीवर लागू झाला आहे पण त्याचा मार्ग फार वेगळा आहे. कोरोणा नंतर लाॅक डाऊन मुळे कोसळलेली सिने इंडस्ट्री आता कोठे लंगडत चालू झाली होती तोपर्यंत भाजप सरकारने त्यांच्यावर अनेक नियमांचा ससे मीरा लावला आहे. रणधीर कपूरचा आयन मुखर्जीने दिग्दर्शित केलेला ब्रह्मास्त्र याच्यावर अनेक बंधने लावली तो प्रदर्शित व्हायच्या अगोदरच सप्टेंबर नऊला काही लोकांचा उठाव करून तो बंद पाडायचा प्रयत्न झाला उजव्या विचारसरणीच्या हिंदूंनी दंगा केल्यावर लखनऊच्या नोवेल थिएटर मध्ये पद्मावत चित्रपटाचा खेळ सुरू होतानाच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हजर झाला.

दीपा मेहरा ,अमीर खान, अक्षय कुमार अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटाविरुद्ध दंगा सुरू करण्यामागे संघाची विचारसरणी आहे. संघाची बॉयकट टीम एखाद्याबद्दल गैरसमज पसरण्यामध्ये तरबेज आहे मग ती घटना कोणत्याही क्षेत्रातली असो एका संशोधनानुसार whatsapp चे 53 कोटी युजर्स आहेत तर युट्युब चे 45 कोटी आहेत फेसबुकचे 41 कोटी इंस्टाग्राम चे 21 कोटी हे आकडे पाहिले तर या माध्यमातून एखाद्या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच कसे संपवायचे याचे तंत्र आता प्रगत झाले आहे त्यामुळे प्रेक्षकांची मने कशी प्रदूषित करायची याकडे आता भाजपचे लक्ष लागले आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे एकमेव ध्येय त्यांनी ठरवलेले दिसते प्रेक्षकाचा किंवा ग्रंथ वाचकाचा त्या ग्रंथातील विचारावर किंवा चित्रपटातील विचारावर जी श्रद्धा असते ती महत्त्वाची असते तीच उध्वस्त केली की आपोआप चित्रपट निष्प्राण होतो आणि त्यामुळे जसा मीडिया विकला गेला तसेच जे चित्रपट आम्ही म्हणतो तसे दाखवत नसतील तर त्यांनाही संपवायचे हा एकमेव मार्ग चित्रपट सृष्टीचा गळा घोटत आहे एकदा का चित्रपट कोसळला की त्यावर प्रचंड पैसा लावणारे दिग्दर्शक आर्थिक रित्या संपून जातात आणि पुन्हा ते उभारी घेऊ शकत नाहीत. राज कपूरच्या मदर इंडिया पासून आज पर्यंत चित्रपटसृष्टीने भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठीच मदत केली पण आज बॉलिवूडला आपल्या कब्जात घेण्यासाठी राजकीय सत्ता कार्यरत झाली आहे लोकशाही आणि स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सरळ सरळ हा खून आहे मित्रांनो उठा जागे व्हा आता तरी ह्या येणाऱ्या एकाधिकारशाहीला कडाडून विरोध करा नाहीतर तुमच्या गुलामगिरीवर शिक्का मारलेलाच आहे.

डॉ सुभाष देसाई गारगोटी कोल्हापूर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.