Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका...

सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका...


सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार संजय काका पाटील  यांच्या गटाकडून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित आर. आर. पाटील यांच्या गटाला धोबीपछाड देण्यात आली. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. दहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा खासदार पाटलांनी काढला.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे निवडणुकीत विजयी होऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपा खासदार व विरोधी गटाकडून सिंधुताई गावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी चार सदस्य फुटले, राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी गैरहजेरी लावल्याने संख्याबळ सहा झाले होते, मात्र विरोधातल्या घोरपडे गटाची दोन मतं ही राष्ट्रवादीला मिळाली. तर खासदार संजयकाका पाटील गटाला आठ मते मिळाली.

राहुल जगताप आणि सिंधुताई गावडे यांना प्रत्येकी आठ मते मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर सोडत घेतली, ज्यामध्ये सिंधुताई गावडे निवडून आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी एकाकी झुंज देऊन दहा महिन्यांपूर्वी मिळवलेली सत्ता अखेर संपुष्टात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.