Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेरोजगार उमेदवारांसाठी ३१ ऑक्टोबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार

बेरोजगार उमेदवारांसाठी ३१ ऑक्टोबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार


सांगली, दि. 20,  : बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सोमवार, दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/ykr-ypyp-wra या लिंकवर विहीत वेळेपूर्वी वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

या वेबीनारमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता या मधील UGC आणि कौशल्य विकास मंत्रालय यांची भूमिका या विषयी श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशन चे असोशिएट प्रोफेसर डॉ. युवराज पवार हे माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.