Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम कामगारांची दिवाळी रिकामीच बोनस शिवाय!

बांधकाम कामगारांची दिवाळी रिकामीच बोनस शिवाय!


महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या श्रमातून 14 हजार कोटी रुपये उपकरा मधून शिल्लक असूनही त्यातील प्रत्येक कामगारास 10 हजार रुपये देण्यास सरकार असमर्थ! बांधकाम कामगारांची दिवाळी रिकामीच बोनस शिवाय! महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती व इतर संघटनानी मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र शासनाकडे दहा हजार रुपये दिवाळीच्या वेळेस बोनस मिळावा अशी मागणी केलेली होती. प्रत्यक्षामध्ये 16 ऑक्टोबर२०२२ रोजी सांगली येथे कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना कृती समितीच्या वतीने निवेदन दिले असता त्यांनी बांधकाम कामगारांना बोनस देण्यास सहमती दर्शवली. याबाबतचा रिपोर्टही त्यांनी मंत्रिमंडळाकडे पाठवलेला आहे. परंतु तरीही मंत्रिमंडळाने याबद्दलचा निर्णय न घेतल्याने महाराष्ट्रातील बावीस लाख बांधकाम कामगारांच्या मध्ये  निराशा पसरलेली आहे. याला जबाबदार  महाराष्ट्र सरकार आहे. 

कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातील बारा लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी साडेसहा हजार रुपये आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी प्रत्येक बांधकाम कामगारास पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची योजना फेब्रुवारी 2020 मध्ये बंद केलेली आहे. 

त्यामुळे सन 2022 मधील या दिवाळीच्या वेळेस सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह  अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली. कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, सध्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सदतीस लाख अर्ज दाखल आहेत त्यापैकी 22 लाख अर्ज मंजूर असून अजूनही 15 लाख अर्जांची तपासणी करणे मंजूर करणे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याबाबत  तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.

सध्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 14 हजार कोटी रुपये शिल्लक असल्यामुळे दहा हजार रुपये देणे देण्याचा निर्णय घेण्यास शासनाला शक्य आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळण्याबाबत ईमेल द्वारे निवेदन 17 ऑक्टोबर रोजी  पाठवल्यानंतर ते निवेदन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेले आहे. परंतु प्रत्यक्षात निर्णय घेतलेला नाही.

म्हणूनच त्वरीत महाराष्ट्र शासनाने 22 लाख बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय न घेतल्यास या दिवाळीमध्ये सुद्धा २२लाख बांधकाम कामगारांना नाईलाजस्तव  आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्ध केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.