Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारची काँग्रेसविरोधात मोठी कारवाई,राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन रद्द

केंद्र सरकारची काँग्रेसविरोधात मोठी कारवाई,राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन रद्द


केंद्र सरकारने काँग्रेसवर आतापर्यतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे विदेशातून फंड स्वीकारण्याचे लायसन्स रद्द केले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट  परवाना रद्द केला आहे.

राजीव गांधी फाउंडेशन ही गांधी कुटुंबाशी संबंधित संस्था आहे. फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे समोर आले. गृह मंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुलै 2020 मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती.

या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. या व्यतिरिक्त या फाउंडेशनच्या विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, लोकसभा खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत.

याची स्थापना 1991 मध्ये झाली, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, दिव्यांगांना आधार यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करते. 1991 ते 2009 या काळात फाऊंडेशनने शिक्षणाच्या विकासावर भर दिला होता. अशी माहिती फाउंडेशनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.