Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कार्यालयात हॅलोऐवजी 'वंदे मातरम'; जीआर केला जारी

सरकारी कार्यालयात हॅलोऐवजी 'वंदे मातरम'; जीआर केला जारी


राज्‍य सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापीठे, निमसरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयाचे लँडलाइन फोनवर 'हॅलो' ऐवजी आता 'वंदे मातरम' म्हणावे लागणार आहे. अर्थातच, त्‍याची सक्‍ती नाही. त्याबाबतचा 'जीआर' जारी करण्यात आला आहे. महात्मा गांधी जयंती आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबरपासून अभिवादनातील बदलाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. दूरध्वनीवर संभाषणाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती नाही; पण राष्ट्राच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने 'वंदे मातरम' अभिवादन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचे आदेश दिले होते. आता त्याबाबतचा शासन निर्णय काढला. हा निर्णय शासकीय, निमशासकीय, स्थानिक नागरी संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापना तसेच शासनाचे अंगीकृत उपक्रम यांना लागू असणार आहे. 'हॅलो' हा अर्थहीन शब्द आहे, असे पत्रकात म्हटले आहे. त्याऐवजी फोनवरील संभाषण आणि वैयक्तिक संभाषण 'वंदे मातरम‌' सुरू केले तर ते सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.