Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंची बेहिशोबी मालमत्ता आहे का?

उद्धव ठाकरेंची बेहिशोबी मालमत्ता आहे का?


राज्यातील सत्ता पालटानंतर शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वारंवार टीका केली जात आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर ठाकरे गटाकडून जोरदार प्रहार केला जात आहे. दरम्यान यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरवर हातून जोडून विनंती केली आहे. ते महाराष्ट्र सुस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती. असल्याचे ते म्हणाले.

सामंत यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते..परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही..महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे..भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती. असे सामंत म्हणाले.

फॉक्सकॉन वेदांताच्या जागी दुसरा प्रकल्प येणार होता?

आजचा धोरणात्मक निर्णय ही त्याच अनुषंगाने आहे. एखादी कंपनी इथे येणार असेल तर त्यांना सुविधा ही देणं गरजेचं आहे. त्याअनुषंगाने मी पाहणी केली. त्याच दृष्टीने मी दौरा करतोय.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले जाणार?

रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही. पण चार दिवसांपूर्वी आमचा गट नाराज आहेत. तेंव्हा मीच म्हणालो होतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत, ते योग्यवेळी त्यांचा निर्णय घेतील.

भास्कर जाधव हल्ला प्रकरणावर उदय सामंत म्हणतात

माझं आजचं आणि कालच ट्विट तुम्ही पाहिलं असेल तर त्यातून अनेक बाबी समोर येतात. शरद पवार आणि अजित पवारांनी एखादी चांगली गोष्ट होत असेल तर चांगलं म्हणा. नाहक प्रतिक्रिया देऊन, उगाच कोणाला उचकवू नये. म्हणून मी आज केलेलं ट्विट महत्वाचं. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. भावी पिढीचा राजकारणावर विश्वास राहिला पाहिजे, असं वाटत असेल तर पात्रता ढासळू देऊ नये. मात्र लोकशाहीमध्ये बोलण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, फक्त याची मर्यादा बाळगायला हवी.

उद्धव ठाकरेंची बेहिशोबी मालमत्ता आहे का?

उच्च न्यायालयात याबाबत जी याचिका दाखल झाली आहे, त्याबाबत मला काही कल्पना नाही. उच्च न्यायालय त्याबाबत ठरवेल. मी त्यांच्यासोबत करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो. मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. राजकीय पत्रकार परिषद आणि बोलण्याला काहीतरी बंधनं असायला हवीत. शेवटी राजकारण करताना किती तानायचं आणि वैर घ्यायचं हे ठरवायला हवं.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये वाद?

या दोघांमध्ये वाद आहे, हे मला पत्रकारांकडूनच कळतंय.अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे. मात्र आता खोके खोके बोलून आम्ही फुटत नाही, त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय नाही हे दाखविण्याचे प्रयत्न केले जातायेत. पण विरोधक यात यशस्वी होणार नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.