Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का?

खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का?


काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर 80 वर्षीय खर्गे यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्यापासून ते सर्व राज्यांमध्ये नव्याने संघटना बांधणी करण्याचे आव्हान असेल.

काँग्रेस कार्यकारिणीसाठीही त्यांना नव्याने काम करावे लागणार आहे. वरिष्ठ नेत्यांसोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस आणि सचिवांसह नवीन टीमची निवड करावी लागणार आहे. यातच खर्गे नवीन अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच प्रश्नच उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने सर्वेक्षण केलं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये साप्ताहिक निवडणूक सर्वेक्षण सी-व्होटरने केले आहे. सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशातील 1,397 आणि गुजरातमधील 1,216 लोकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणातील एररचे मार्जिन प्लस मायनस 3 ते प्लेस मायनस 5 टक्के असू शकते.

सी व्होटरच्या या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसच्या परिस्थितीत बदल होणार? या प्रश्नावर सर्वेक्षणात 42 टक्के लोकांनी काँग्रेसची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली, 33 टक्के लोकांनी पूर्वीपेक्षा वाईट होईल असं म्हटलं आहे. तर 25 टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेमुळे कोणताही बदल होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसच्या परिस्थितीत बदल होणार?

पूर्वीपेक्षा चांगली परिस्थिती होईल: 42%

पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती होईल: 33%

कोणताही बदल होणार नाही: 25%

दरम्यान, 26 ऑक्टोबर रोजी खर्गे अधिकृतपणे काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीही आपली भारत जोडो पदयात्रा सोडून दिल्लीत येणार असून ते खर्गे यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. खर्गे या वर्षाच्या अखेरीस एआयसीसीचे अधिवेशन बोलवू शकतात, अशी अपेक्षा आहे. यातच CWC च्या निवडणुका प्रस्तावित आहेत. ज्यामध्ये 12 सदस्य निवडले जातील. AICC चे सुमारे 1400 सदस्य सदस्य निवडतील. निवडणुकीत त्यांची टीम एकत्र करण्यासाठी खर्गे  च्या उच्च पदांवर नियुक्ती देखील करू शकतात. 23 सदस्यीय पक्षात निर्णय घेण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.