Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुदत पाहूनच जंतनाशक गोळ्यांचे वाटप करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

मुदत पाहूनच जंतनाशक गोळ्यांचे वाटप करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 07,  : जंतनाशक गोळ्यांची मुदत पाहूनच त्याचे वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. दि. 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माता व बाल प्रजनन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले, मुलांना रांगेत उभे करून गोळ्या द्याव्यात. गोळ्या जेवणानंतरच दिल्या जातील याची दक्षता घ्यावी. गोळी दिल्यानंतर मुलांना किमान दोन तास निरीक्षणाखाली ठेवावे. ग्रामिण भागातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांशी समन्वय साधून गावातील प्रत्येक मुलाला जंतनाशक गोळी दिली जाईल, असे पहावे. लोकांमध्ये याविषयी अनेक गैरसमज असतात ते दूर करण्यासाठी जनजागृती करावी. महानगरपालिका व नगरपालिकेच्या क्षेत्रात घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.