Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महामंडळ मजबूत करण्यासाठी राज्यातील संस्थांनी जिल्हा संघाचे आजीव सभासद व्हावे.. -रावसाहेब पाटील

महामंडळ मजबूत करण्यासाठी राज्यातील संस्थांनी जिल्हा संघाचे आजीव सभासद व्हावे.. -रावसाहेब पाटील


सांगली दि. 8: महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ ही राज्याची बलाढ्य ताकद आहे. खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेली पन्नास वर्षे महामंडळ कार्यरत आहे. शिक्षण संस्थांना प्रश्न मांडण्यासाठी हे हक्काचे ठिकाण आहे. बहुजन शिक्षण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सर्व संस्थांनी जिल्हा संघाचे आजीव सभासद होऊन महामंडळाच्या एकाच छताखाली येऊन संघटन मजबूत होण्यास सहकार्य करावे असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले.जत तालुक्यातील कै. रामचंद्र पाटील शिक्षण संस्थेचा सभासदत्व मागणी अर्ज स्वीकारताना ते बोलत होते. 

महामंडळाच्या सांगली अधिवेशनामुळे  महामंडळाच्या प्रवाहात खासगी शिक्षण संस्था सामील होण्याची प्रक्रिया गतीमान झाली आणि त्याची प्रचिती आज आली. याचा प्रारंभी सांगली जिल्ह्यातून झाला आहे.कै.रामचंद्र पाटील शिक्षण संस्था कुणीकोन्नूर ता. जत या संस्थेचे सचिव निवृत्त लष्करी अधिकारी श्री. ज्ञानदेव चव्हाण व येळवी जनमत चे पत्रकार संजय कांबळे हे आज सांगली येथे रावसाहेब पाटील यांच्या दालनात येऊन त्यांच्या संस्थेला आजीव सभासद करुन घ्या अशी विनंती केली. तातडीने त्यांचा फाॅर्म नमस्कार स्विकारुन संस्था नोंदणीचा कागद घेऊन त्यांना पावती देण्यात आली.श्री. ज्ञानदेव चव्हाण यांनी तालुक्यातील आणखी काही संस्था सभासद करण्यासाठी फाॅर्म घेतले.ते संस्थेतर्फे इ.५ वी  ते १० पर्यंतची शाळा चालवतात.

सनमडी गावापासून जवळच ती शाळा आहे आणि त्या पंचक्रोशीत एक चांगली गुणवत्तायुक्त शाळा म्हणून नावलौकिक आहे.अशी शाळा आणि संस्था आज सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या छताखाली आली ही घटना शिक्षण क्षेत्राला भूषणावह आहे. यावेळी कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी व जिल्हा संघाचे जाँईट सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे व कोल्हापूर विभागीय संघटक आणि जिल्हा संघाचे प्रवक्ता विनोद पाटोळे उपस्थित होते. राज्यभर खासगी शिक्षण संस्था या जिल्हा संघाचे सभासद होऊन महामंडळाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची मोहीम गतीमान केली पाहिजे हा सांगली अधिवेशनाचा संदेश आहे. याला सांगलीने गती दिली आहे असेही रावसाहेब म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.