Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणीला 'आयटम' म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली...

तरुणीला 'आयटम' म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली...


लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुंबईतील एका न्यायालयाने एका व्यक्तीला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' बोलवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. न्यायालयाने म्हटले, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल.

एक महिन्यापासूनमुलीचा पाठलाग

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील कोर्टाने 26 वर्षीय व्यावसायिकाला 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. 2015 मध्ये आरोपीने शाळेतून परतणाऱ्या मुलीचे केस ओढत म्हटले 'क्या 'आयटम' कहाँ जा रही है?' न्यायालयाने सांगितले की, आरोपी एक महिन्यापासून लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग करत होता

रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक -न्यायाधीश एसजे अन्सारी

माहितीनुसार, आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी म्हणाले की, महिलांना अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यावसायिकाला पोक्सो कोर्टाने दोषी ठरवले. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणी अडकविण्यात आले होते. या अल्पवयीन मुलीला जुलै महिन्यातच न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की...

या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की, ती 14 जुलै 2015 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत जात होती. आरोपी त्याच्या गल्लीत बसला होता. तो त्याच्या मित्रांसोबत होता. मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा ती दुपारी 2.15 च्या सुमारास शाळेतून परतली. त्यानंतरही आरोपी रस्त्यात दुचाकीवर बसला होता. तिला पाहताच तो तिच्या मागे आला, असे अल्पवयीन मुलीने सांगितले. तसेच त्या तरुणाने तिचे केस ओढले आणि तिला आयटम बोलला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.