राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू गिरीष जकाते याचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सत्कार
सांगली, दि. 19, : गुजरात येथे दि. 27 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात सांगली जिल्ह्यातील खेळाडू गिरीष वैभव जकाते यांने सांघीक प्रकारात रौप्य पदक व वैयक्तीक प्रकारात कास्यपदक संपादन केले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते गिरीष जकाते याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गिरीष जकाते याची संपूर्ण विचारपूस करून आत्तापर्यंत खेळलेल्या स्पर्धेबाबत माहिती घेतली. तसेच नोकरीसाठी थेट नियुक्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा असे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.