Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांनी केली मोठी घोषणा..

अमित शहांनी केली मोठी घोषणा..


नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आता सहकारी बँकेच्या  ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर शी जोडण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

सध्या सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. त्यामुळे आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहेत. अमित शहा यांनी बोलताना सांगितले की, बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय जन, धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा थेट बँक ग्राहकांना मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभही मिळाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे ‘सहकार से समृद्धी का संकल्प’मुळेच हा लाभ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

बँकेच्या या योजनेविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमध्ये सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. पीएम जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या कोट्यवधी नवीन खात्यांचे डिजिटल व्यवहारही एक ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. तर 2017-18 या वर्षातील डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यामध्ये 50 पट वाढ झाली आहे.

डायरेक्ट बँक ट्रान्सफरसह सहकारी बँका जोडल्या गेल्याने नागरिकांशी अधिक संपर्क वाढून आणि सहकार क्षेत्र बळकट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या या योजनेची माहिती सांगताना ते म्हणाले की, आरबीआय आणि नाबार्डने बँकिंगसाठी तयार केलेल्या सर्व मापदंडांवर कृषी बँकेने स्वतःला आता सिद्ध केले आहे. यापूर्वी बँकेकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, ते आता 10 टक्क्यांवर आले आहे. इतकेच नव्हे तर कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन टक्के सवलतही दिली जाते असंही त्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.