Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रचंड वाढलेली महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना किमान दहा हजाराची भेट द्यावी - राज्य प्रवक्ता संतोष पाटील.

प्रचंड वाढलेली महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना किमान दहा हजाराची भेट द्यावी - राज्य प्रवक्ता संतोष पाटील.



महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाने दिवाळीच्या वर्षा पूर्वी  सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सर सकट पाच हजार रुपयाची भेट राज्य सरकारने जाहीर केले आहे. बाजारात तेलाच्या व डाळीच्या प्रचंड वाढलेली महागाई मुळे दिवाळीच्या खरेदीसाठी पाच हजार रुपये खूपच तुटपुंजीआहे, कारण गेले दोन वर्षे कोविडच्या परिस्थितीमुळे कोणीही उत्साहाने दिवाळी साजरी केली नाही. त्यामुळे दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी लोक बाजारात खरेदीसाठी दिसत आहेत .त्यातच अनेक दिवस एस टी संपामुळे एसटी कर्मचारी व त्याच्या कुटुंबाचे हाल झाले होते, तसेच कोविडच्या काळामध्ये अनेक दिवस एसटी बंद असल्यामुळे त्यामुळे त्यांचे कुटुंब मुले त्यांची झालेली परिस्थिती खूप बिकट होती.

दोन वर्षे दिपवाली साजरी करू न शकल्यामुळे यावर्षी सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरी करो लागल्याचे दिसत आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी पगार असतो .त्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा चालविताना खूपच कसरत करावी लागते. अशातच राज्य सरकारने त्यांना दिलेली 5000 रुपयाची ची भेट खूपच कमी आहे. कमीत कमी दहा हजार रुपये द्यावे असे विनंती चे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना लिहिले आहे. अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ताते व दरारा या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वरीलउल्लेख केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.