Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभियंता तरुणी आणि आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला...

अभियंता तरुणी आणि आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला...


अमरावती जिल्ह्यात अभियंता मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील संमती शिक्षक कॉलनीत ही घटना घडली आहे.

ही घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुवर्णा वानखेडे (वय 51 वर्षे) आणि मृणाल प्रदीप वानखडे (वय 25 वर्षे) असं मृत आई आणि मुलीचं नाव आहे. दरम्यान अभियंता मुलगी मृणालचे वडील प्रदीप वानखेडे हे शिक्षक असून ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथे एका खाजगी शाळेत कार्यरत आहेत. मंगळवारी (25 ऑक्टोबर) प्रदीप वानखडे हे शेगावला गेले होते.

मृत्युची माहिती पोलिसांना कशी मिळाली?

परिसरातील एका हनुमान मंदिराजवळ काल (25 ऑक्टोबर) सायंकाळी एका व्यक्तीला सोन्याचे दागिने आणि काही रोकड पडल्याची दिसली. त्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांना कळलं की हे दागिने सुवर्णा वानखेडे यांचे आहेत. पोलीस त्यांच्या नातेवाईकांना घेऊन घरी गेले तेव्हा दार बंद असल्याने दार तोडून घरात गेले, तेव्हा त्या माय-लेकीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

मृतदेहांच्या शेजारी चिठ्ठी आढळली

या दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तर पोलीस दाखल झाले तेव्हा त्यांनाएक चिठ्ठी आढळली. ज्यामध्ये लिहिलं की, "आमचे अंतिम संस्कार आखरे परिवार (त्यांचा भाऊ) करणार." दरम्यान ही चिठ्ठी कोणी लिहिली याचा तपास पोलीस करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.