Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवीन व्यवसाय , इम्पोर्ट व एक्सपोर्ट शिबिराचे ४ ऑक्टोंबर रोजी सांगलीत उद्‌घाटन - सुरेश पाटील

नवीन व्यवसाय , इम्पोर्ट व एक्सपोर्ट शिबिराचे ४ ऑक्टोंबर रोजी सांगलीत उद्‌घाटन -  सुरेश पाटील


सांगली :
जिल्ह्यातील नवीन पिढीसाठी भावी काळाची गरज ओळखून त्यांना नवीन व्यवसाय कसा शोधायचा व एक्स्पोर्ट - इम्पोर्ट याबाबतची संपूर्ण माहिती होण्यासाठी जागतिक कीर्तीचे व्यापार सल्लागार डॉ. जगत शहा, अहमदाबाद यांचे 4 ते 7 ऑक्टोबर 2022 रोजी दि सांगली ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मार्केट यार्ड, सांगली येथे शिबिराचे आयोजन सांगली स्पाइस फुड असोसिएशन तर्फे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली .                             

ते म्हणाले डॉ . जगत शहा हे अहमदाबाद येथे ' ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूट' ही आंतरराष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण संस्था चालवत असून गेल्या 21 वर्षापासून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवसाय कार्यक्रमाचे 160 बॅचचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये जगभरातील ४५०० व्यावसायिकांनी भाग घेतला आहे . ते ग्लोबल चेंबर (युएसए ) चे जागतिक सल्लागार आहेत . तसेच आर्थिक विकास संस्था क्लस्टर प्लस , आंतरराष्ट्रीय व्यापार सल्लागार फर्म - ग्लोबल नेटवर्क, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण संस्था - ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष ,संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक  म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट्स  -भारत आयातदार परिषदेचे उपाध्यक्ष,  जर्मन - इंडियन बिझनेस सेंटरचे सहयोगी संचालक आहेत .         

ते म्हणाले या शिबिराच्या माध्यमातून युवकांना नवीन व्यवसाय कसा शोधायचा तसेच इम्पोर्ट व एक्सपोर्ट या बाबतची संपूर्ण माहिती दिली जाणार असून आपण आपला व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी नवीन व्यवसाय शोधणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या नवीन पिढीसाठी निर्यात व्यवसाय कसा सुरू करणे त्याचप्रमाणे याची संपूर्ण माहिती या चार दिवसांमध्ये दिली जाणार आहे. तसेच त्यांना पुढील तीन महिन्यांमध्ये हा व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणीच्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन  डॉ. जगत शहा करणार आहेत .  

गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी कोल्हापूर येथील शंभरहून अधिक युवकांना असे प्रशिक्षण दिले असून या प्रशिक्षित युवकांनी दरवर्षी दहा कोटी पासून शंभर कोटी पर्यंतचा निर्यात व्यवसाय  केला आहे. तरी या शिबिराच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी आम्ही ज्ञानयज्ञ सुरू करीत असून त्याचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.