Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूर, ता. वाळवा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर अन्याकारक गुन्हा दाखल केले पोलीस अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत.....

इस्लामपूर, ता. वाळवा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर अन्याकारक गुन्हा दाखल केले पोलीस अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत.....


इस्लामपूर, ता. वाळवा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर फेरफार नोंदीवरून गुन्हा दाखल करणेपूर्वी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कोणतीही वे कायदेशीर कृती केलेली नसताना इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी तलाठी यांचे विभाग प्रमुख म्हणून मा. उपविभागीय अधिकारी वाळवा व मंडळ अधिकारी यांचे बाबतीत मा. जिल्हाधिकारी सांगली यांची परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच सदर तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडून झालेली कार्यवाही बाबत वरिष्ठ महसूल अधिकारी यांचेकडून शहनिशा न करताच गुन्हा दाखल करणेची कार्यवाही केलेली आहे.

संबधित पोलीस अधिकारी हे महसूल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेवर सूड बुद्धीने व बेकायदेशीरपणे कारवाई करत आहेत असे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे मत झाले आहे. तरी संबधित पोलीस अधिकारी यांची चौकशी व्हावी व त्यांचेविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई व्हावी असे संदर्भीय निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात आली होती. मात्र सदर निवेदनाबाबत आजअखेर जिल्हा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व महसूल कर्मचारी यांच्यामध्ये असंतोषाची भावना अनावर झालेली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेस आंदोलनाची भूमिका घेणे भाग पडले आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक १८/१०/२०२२ पासून जिल्हयातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, वहान चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. तरी दि. १७/१०/२०२२ पर्यत संबंधित पोलीस अधिकारी श्री. शशिकांत चव्हाण यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती. अन्यथा दि. १८/१०/२०२२ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणेत येईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामास संघटना जबाबदार राहणार नसून, त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती.

आंदोलनाची दिशा पुढीलप्रमाणे राहील...

१. मंगळवार दिनांक १८/१०/२०२२ पासून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे बेमुदत काम बंद. 

२. बुधवार दिनांक १९/१० / २०२२ पासून महसूल कर्मचारी, कोतवाल, वाहन चालक चतुर्थ कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद. 

३. गुरुवार दिनांक २०/१०/२०२२ पासून राजपत्रित अधिकारी यांचे बेमुदत काम बंद.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.