Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार-आमदार हे लोकशाहीला कलंक - संभाजी भिडे

खासदार-आमदार हे लोकशाहीला कलंक - संभाजी भिडे


खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी हे लोकशाही परंपरेला कलंक आहेत, अशी टीका बुधवारी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच सर्वधर्म हा गांडूळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. दसऱ्याला दौडीची सांगता झाली. या वेळी संभाजी भिडे यांनी हे वादग्रस्त विधान केले. भिडे म्हणाले, अनेकांनी हसत हसत ऐन तारुण्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपल्या देशाला केवळ मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजेत. नेमकी तिथेच बोंब आहे. आपले आमदार-खासदार यांना लोक निवडून देतात, पण त्यांना शरम वाटत नाही… भाडोत्री, बेकार, कलंक आहेत हे लोकशाहीला आणि परंपरेला, अशी टीका त्यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.