Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युपी, बिहारी मजुरांना पकडून मेळाव्याला आणले...

युपी, बिहारी मजुरांना पकडून मेळाव्याला आणले...


शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची कॉपी करण्याच्या शिंदे गटाच्या केविलवाण्या प्रयत्नांचे चांगलेच हसे झाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भव्य मैदान भरायचे कसे? या कोडय़ात पडलेल्या शिंदे गटाने मुंबईबाहेरून अनेक परप्रांतीय कामगारांना धरून-पकडून मेळाव्याच्या ठिकाणी आणले. पुण्यात युपी, बिहारी, बंगाली मजुरांची धरपकड करण्यात आली. त्यापैकी कुणाला मुंबई फिरायला चला, तर कुणाला यात्रेला जायचेय, असे सांगून ट्रव्हल्समध्ये कोंबण्यात आले. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शिंदे गटाच्या मेळाव्याची पुरती बेअब्रू झाली.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीनेच हादरून गेलेल्या शिंदे गटाने बुधवारी बीकेसीवर गर्दी जमवण्यासाठी आटापिटा केला. भव्य मैदानावर लाखभर लोकांची गर्दी करण्याचे टार्गेट ठेवले, पण प्रत्यक्षात मेळाव्याची वेळ जवळ येताच शिंदे गटाची चांगलीच तंतरली. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर शिंदे गटाने अनेक बसेस उभ्या केल्या, मात्र त्यापैकी मोजक्याच बस भरल्या. त्यामुळे उर्वरित बसेस भरण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागात 'धरपकड' मोहीम राबवली. यादरम्यान युपी, बिहार, बंगालच्या कामगारांना फुकटच्या 'मुंबई दर्शन'चे आमिष दाखवण्यात आले.

कुठे चाललोय त्याची माहिती नाही

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवरील रिकाम्या बसेस यूपी-बिहारी, बंगाली कामगारांमुळे कशाबशा भरल्या. मात्र त्या कामगारांकडे आपण कुठे चाललोय, आपल्याला कोण नेतेय याची उत्तरेच नव्हती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न केले, त्यावर त्या कामगारांची बोबडी वळली.

गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने गावागावांतून गरजू लोक, मजुरांची जमवाजमव केली, पण मुंबईत आणल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेची अक्षरशः बोळवण केली. बीकेसी मैदानावर बसण्याची व्यवस्थाही योग्य पद्धतीने केली नाही. परिणामी, अनेकांना ताटकळत उभे राहावे लागले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.