जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीत अशासकीय सदस्य निवडीसाठी २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 20, : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन नवीन निवड समिती गठीत करण्यात आली होती. सदर समिती दि. 8 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली आहे. सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षासाठी नवीन जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीमधील नवीन अशासकीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य निवड करावयाची आहे. यासाठी इच्छुक तज्ज्ञ कलाकारांनी दि. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज जिल्हा परिषद सांगली समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. प्राप्त अर्ज पालकमंत्री यांच्याकडे अंतिम निवडीसाठी सादर करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.