Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थींच्या विरूध्द शास्ती निश्चित

शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थींच्या विरूध्द शास्ती निश्चित


सांगली, दि. 20,  : शिक्षक पात्रता परीक्षा 2018 च्या दि. 15 जुलै 2018 रोजी झालेल्या परीक्षेमध्ये गैरव्यवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी यांच्या विरूध्द परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता 1 हजार 663 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार निष्पन्न झाले आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यानी गैरप्रकार करून स्वत:स पात्र करून घेतले. शिक्षक पात्रता परीक्षा 2018 चा अंतिम निकाल दि. 12 ऑक्टोबर 2018 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला त्यानुसार एकूण 9 हजार 677 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी  779 उमेदवार ते प्रत्यक्ष अपात्र असताना त्यांच्या गुणामघ्ये फेरफार करून पात्र घोषित केले असल्याने ते गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच 884 उमेदवारांनी आरोपींच्या संगनमताने बनावट प्रमाणपत्र /गुणपत्रक प्राप्त करून घेतले आहे. गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी यांच्या विरूध्द परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.