Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेस खासदार सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट

कर्मवीर पतसंस्थेस खासदार सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट


सांगली :- खासदार सुप्रियाताई सुळे या नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त सांगली येथे आल्या असता त्यांनी आवर्जून येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती खासदास सुप्रिया सुळे यांना दिली. संस्थेच्या ठेवी रुपये ७५३ कोटी आहेत. संस्थेने ५५० कोटीचं कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा स्वनिधी ७३ कोटी आहे. संस्थेची गुंतवणुक २६४ कोटीची आहे. संस्थेचा कारभार ५३ शाखा मधुन सुरु असून संस्थेची सभासद संख्या ४८ • आहे. संस्था सभासदांना तत्पर सेवा देते त्यामुळे संस्थेचे सभासद संतुष्ठ असल्याचे श्री. रावसाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा संस्थेच्या वतीने चेअरमन यांनी सत्कार केला.

यावेळी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या कि या भागात सहकार चांगला रुजला आहे. याच भागात कर्मवीर पतसंस्थेने बांधलेली मुख्यालयाची वास्तु पाहून अतिशय आनंद झाला. सांगली जिल्ह्याने मा. यशवंतराव चव्हाण... • वसंतदादा पाटील यांच्या सारखे नेते देशाला दिले. आपण कर्मवीर आण्णांच्या नावाने आपण अतिशय उत्तम संस्था चालवित आहात, सहकारामध्ये जशा काही वाईट गोष्टी पडल्या त्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्याची माहिती सर्वांना दिली पाहिजे, थोर नेते भाषणात नाव घेण्यापुरते न राहता मोठ्या लोकांचा इतिहास समाजाला कळला पाहिजे. माणूस तंत्रज्ञानाकडे वळला आहे. त्याच माध्यमातून समाजाला माहिती दिली पाहिजे सहकाराने खन्या अर्थाने सामान्य माणसाला आधार दिल्याचे त्यांनी सांगितले.

( ज्या वेळी संसदेत सहकार विषयावर चर्चा होईल त्यावेळी मी आपल्या संस्थेच्या कार्याचा उल्लेख नक्की करेन असे सुप्रियाताई म्हणाल्या)

यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम डॉ. नरेंद्र आनंदा खाई डॉ रमेश वसंतराव ढबू श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. अशोक सकळे तज्ञ संचालक डॉ. एस. बी • पाटील (मोटके) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांचे सह सांगली चे महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, श्री. संजय बजाज, श्री. एन.डी. बिरनाळे उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.