Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळांशी समन्वय साधून मुलांचे शंभर टक्के कोविड लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शाळांशी समन्वय साधून मुलांचे शंभर टक्के कोविड लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 07,  : आरोग्य यंत्रणेने शाळांशी चर्चा करून व समन्वय साधून दिवाळीपूर्वी मुलांचे 100 टक्के कोविड लसीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. कोविड लसीकरणासह आरोग्य विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माता व बाल प्रजनन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक उपस्थित होते. जिल्ह्यात 100 टक्के कोविड लसीकरण करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले, यासाठी लसीकरण मोहिम राबवावी. ज्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी जिल्ह्यात 98.75 टक्के लोकांनी पहिला डोस तर 87.7 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांचे प्रमाण 12.43 टक्के आहे. तर 79.21 टक्के मुलांनी पहिला डोस व 68 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी दिली.

यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा व कार्यक्रमांचा आढावाही घेण्यात आला. त्यामध्ये एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम, नियमित लसीकरण, माता व बाल संगोपन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय अंधत्व निर्मुलन कार्यक्रम, साथ रोग नियंत्रण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम यांचा समावेश होता. यावेळी जिल्ह्यातील अर्भक मृत्यू, बाल मृत्यू व माता मृत्यू शुन्य टक्के करावा. यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबध्द कार्यक्रम राबवावा. जिल्ह्यातील सर्व प्रसृतिंची विश्लेषणात्मक माहिती तयार करावी. या माध्यमातून माता मृत्यूचे कारण तसेच वय, अतिजोखीम व इतर आजार यांची माहिती संकलित करून माता मृत्यूचे प्रमाण रोखता येईल. मातांचा मृत्यू झालेल्या बालकांचा शोध घेवून ते कुपोषीत होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यातील नेत्र रूग्णालय सुरू करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठीचे नियोजन करावे. नेत्र तपासणीची मोहिमही राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.